इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काठमांडू – नेपाळमध्ये ४० भारतीय प्रवाशांना घेऊन जाणा-या बसला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात १४ जण ठार झाले असून १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही बस तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. बस पोखराहून काठमांडूला जात होती. घटनास्थळी नेपाळ लष्कराकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
या अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यूपी एफटी ७६२३ नंबर असलेल्या ही पोखराहून काठमांडूकडे निघाली होती. त्यावेळी अचानक तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत सकाळी साडेअकरा वाजता कोसळली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे.
नेपाळ पोलिसमधील डीएसपी दीपकुमार राय यांनी या घटनेची माहिती देतांना सांगिले की, बस नदीत कोसळली असून ती नदीच्या किना-यावर पडली आहे. स्थानिक पोलिस व बचाव दल घटनास्थळी पोहचले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.