इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नेपाळमध्ये आज सकाळी एक दुर्घटना घडली आहे. तारा एअर 9 NAET या दोन इंजिन असलेल्या विमानाचा नेपाळमध्ये संपर्क तुटला आहे. त्यात १९ प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते. बेपत्ता विमानात चार भारतीय आणि तीन जपानी नागरिकही असल्याची माहिती समोर आली आहे. अन्य सर्व नेपाळी नागरिक आहेत. विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने पोखराहून जोमसोमसाठी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी वाजता उड्डाण केले.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्रमणी पोखरेल म्हणाले की, बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी मंत्रालयाने मुस्तांग आणि पोखरा येथून दोन खाजगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोधासाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारीही सुरू आहे. मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा म्हणाले की, “मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोमच्या आकाशात विमान दिसले. नंतर धौलागिरी पर्वताकडे वळवले गेले, त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही.” त्याचवेळी तारा एअरचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक उत्सव पोखरेल आणि एअर होस्टेस किस्मी थापा हे विमानात होते.
https://twitter.com/ani_digital/status/1530798123249184768?s=20&t=fgsDHHlfefLczVOIbkj60Q