इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नेपाळ मध्ये कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्ये
लोकांनी सोमवारी सरकारविरुद्ध मोर्चा काढून निषेध केला. त्यानंतर सरकारने बंदी उठवली. पण, त्यानंतरही येथील असंतोष कायम होता. मंगळवारी तरुणांनी कायदेमंत्री घर पेटवून दिले. संसद पेटवली. त्यानंतर ९ मंत्र्यांनी राजीनामा दिले. त्यानंतर थेट पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडीनंतर नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात गेली आहे.
दरम्यान नेपाळच्या या सर्व परिस्थितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी हिमाचल प्रदेश आणि पंजाबहून परतल्यावर त्यांनी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली. या बैठकीत नेपाळमधील घडामोडींवर चर्चा झाली. नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे. अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे पाहून मला दुःख झाले आहे. नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना शांततेला पाठिंबा देण्याचे नम्र आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
नेपाळमध्ये २६ प्रमुख सोशल मीडिया अॅपवर बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली. फेसबुक, युट्युब, एक्स, इन्साग्राम, व्हॅाटसअॅप, सह लोकप्रिय प्लॅलफॅार्मवर सरकारने बंदी घातल्यानंतर तरुण रस्त्यावर उतरले होते. भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी विरोधात निषेध करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले. त्यानंतर पंतप्रधानसह अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले. यानंतर लष्कराने सत्ता ताब्यात घेतली.