इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नेपाळ: कथित भ्रष्टाचार आणि फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिकडेच बंदी घातल्याबद्दल काठमांडूमध्ये लोकांनी सरकारविरुद्ध मोर्चा काढून निषेध केला. आजच्या निषेध मोर्चात १८ जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या मोर्चात मोठ्या प्रमाणात तरुण सहभागी झाले होते.
काठमांडुमध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे युवक अद्यापही माघार घेण्यास तयार नाही. नेपाळमध्ये अलीकडे २६ प्रमुख सोशल मीडिया अॅपवर बंधी घालण्यात आली. या बंदीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. फेसबुक, युट्युब, एक्स, इन्साग्राम, व्हॅाटसअॅप, सह लोकप्रिय प्लॅलफॅार्मवर सरकारने बंदी घातल्यानंतर तरुण रस्त्यावर उतरले आहे.
या मोर्चात सामील झालेल्या आंदोनलातील एका मुलीने सांगितले की, आम्ही भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी विरोधात निषेध करण्यासाठी येथे आलो आहोत. रस्त्यावर लोक मरत आहेत. मी १५ हून अधिक लोकांना गोळ्या घालताना पाहिले आहे. पुरेशा रुग्णवाहिका नाहीत आणि रुग्णालयांमध्ये संसाधने संपत आहेत. या सरकारला आमची काळजी नाही.