मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ‘परंपरा – गुरु पौर्णिमा स्पेशल’ हा वार्षिक महोत्सव घेऊन येत आहे. या वर्षी हा उत्सव भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट उस्ताद आणि त्यांचे नामवंत शिष्य एकत्र आणणार आहे. प्रख्यात पं. हरिप्रसाद चौरासीया, पं. कार्तिक कुमार, उस्ताद अमजद अली खान आणि शिष्यांचे सादरीकरण करणार आहेत.
दोन दिवसीय ‘परंपरा’ 30 जूनपासून सुरू होणार आहे. या महोत्सवाची निर्मिती गुरु-शिष्य या पवित्र बंधनाला समोर ठेवून कल्पित करण्यात आली आहे. हे विशेष सादरीकरण NMACC च्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांच्या भारतातील सर्वोत्कृष्ट गोष्टी जगासमोर दाखविण्याच्या आणि जगातील सर्वोत्तम गोष्टी भारतात आणण्याच्या दृष्टिकोनावर आधारित आहे.
30 जून आणि 1 जुलै रोजी हा दोन दिवसीय विशेष कार्यक्रम कल्चरल सेंटर च्या 2000 आसनांच्या ‘द ग्रँड थिएटर’ येथे संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या ठिकाणी ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ आणि ‘द साउंड ऑफ म्युझिक’ सारख्या ऐतिहासिक निर्मितीचे आयोजन करन्यात आले होते.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर च्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, “गुरु केवळ ज्ञानच देत नाहीत, तर शिष्यांना त्यांच्या आत्म-शोधाच्या मार्गावर मार्गदर्शन करतात. गुरू आणि शिष्य यांच्यातील संबंध शिस्त, समर्पण आणि अत्यंत आदराने शासित जीवनभराच्या प्रवासाचे प्रतीक आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त, NMACC येथे या कालातीत परंपरेला आमची विनम्र आदरांजली अर्पण करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘परंपरा’ भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वोत्कृष्ट मास्टर्स आणि त्यांच्या नामवंत शिष्यांना एकत्र आणते. हे पवित्र बंधन साजरे करण्यासाठी आपण एकत्र येऊ या आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सांस्कृतिक वारशात विलीन होऊ या.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ‘परंपरा – एक गुरु पौर्णिमा स्पेशल’ पाहण्यासाठी तिकीट nmacc.com किंवा bookmyshow.com वर बुक केले जाऊ शकतात. तिकिटांची किंमत 750 रुपयांपासून सुरू होते.