विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
शिक्षणमंत्री पदाचा पदभार घेताच धर्मेंद्र प्रधान यांनी पहिलीच मोठी घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या परीक्षेची विद्यार्थ्यांना मोठी प्रतिक्षा होती. अखेर प्रधान यांनी त्याची दखल घेत घोषणा केली आहे. येत्या १२ सप्टेंबर रोजी नीट परीक्षा देशभरात आयोजित केली जाणार आहे. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करत ही परीक्षा होणार आहे. एनटीएच्या संकेतस्थळाद्वारे उद्या (१३ जुलै) संध्याकाळी ५ वाजल्यापासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. सोशल डिस्टनसिंग सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांची संख्या वाढवून १५५ वरून १९८ करण्यात आली आहे. २०२० मधील ३ हजार ८६२ या परीक्षा केंद्राच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे, असे प्रधान यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोनामुळे या परीक्षेबाबत अनिश्चिततेचे सावट होते. अखेर ही परीक्षा आता १२ सप्टेंबर रोजी होणार आहे.
https://twitter.com/dpradhanbjp/status/1414565694226665475