सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणतीही परीक्षा असो विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून त्या संबंधित परीक्षा केंद्रावर अत्यंत काळजी घेतली जाते. त्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींची कडक तपासणी तथा अंग झडती घेतली जाते. परंतु विद्यार्थी विद्यार्थिनींना कपडे संपूर्ण कपडे काढायला लावण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. सांगलीमध्ये देखील नीट परीक्षा दरम्यान असाच प्रकार घडला विशेष म्हणजे विद्यार्थिनींना या परीक्षेच्या वेळेस अंतर्वस्त्र आणि गणवेश उलटे करून परिधान करण्यास भाग पाडण्यात आले. या गैरप्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडली असून विद्यार्थिनींच्या पालकांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या विपरित प्रकाराबद्दल विद्यार्थिनींनी पालकांकडे तकार केली. त्यानंतर पालकांनी त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे. देशभरामध्ये ७ मे रोजी नीट परीक्षा झाली. तेव्हा सांगलीतील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर हा गैरप्रकार घडला. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसण्यासाठी आधी त्यांचे कपडे आणि अंतरवस्त्र उलटे परिधान करायला लावले असा आरोप आता काही विद्यार्थ्यांनी केला असून विद्यार्थ्यांना देखील आपली कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालूनच परीक्षा द्यावी लागली आहे.
परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. याची विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
दुसरीकडे कॉलेज प्रशासनाकडून आपला या परीक्षेची कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच्या पलीकडे आपला या परीक्षेशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गैरप्रकाराबद्दल तीव्र व्यक्त करण्यात येत आहे.
Neet Exam Controversy Girl Student Inner Clothes Bras