इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात घेण्यात येणारी नीट ही परीक्षा १७ तारखेलाच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तारखेला परीक्षा घेण्यात येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली. पण ठरलेल्या तारखेलाच परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आता या परीक्षेचे अॅडमिट कार्ड वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आले असून एका क्लिकवर ते मिळवता येणार आहे.
नीट परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासूनच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा १५ जून रोजी संपल्या आहेत. त्यामुळे नीट परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे कारण विद्यार्थी देत आहेत. तर CUET UG 2022 ची परीक्षा १५ जुलैपासून सुरु होणार आहे. यामुळे तारखांचे संघर्ष निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
दोन पैकी एकच परीक्षा देण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. म्हणून नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत होते. यासाठी ट्विटरवर हॅशटॅग वापरत आंदोलनदेखील करण्यात आले. पण तारखेत कोणताही बदल होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या १७ तारखेला देशातील ५४६ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी १८ लाख ७२ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. दुपारी २ ते ५.२० या वेळेत ही परीक्षा होणार आहे.
या क्रमांकावर करा तक्रार
प्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा. त्यानंतर, वेबसाइटवर दिलेल्या प्रवेश कार्डच्या पर्यायावर क्लिक करा. आता आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट कररा. यानंतर प्रवेश कार्ड स्क्रीनवर दिसेल ते डाऊनलोड करा. याविषयी काही तक्रार असल्यास ०११ – ४०७५९००० वर कॉल करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Neet Exam any doubt or complaint call on this number









