इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
१५ जून रोजी होणारी नीट परीक्षा ही दोन शिप्टमध्ये ने घेता एकाच शिप्टमध्ये घ्या अशा सूचनाा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
याबाबतची माहिती राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने दिली आहे. १५. जून २०२५ रोजी होणारी ही नीट-पीजी २०२५ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नीटच्या परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकात येण्यासाठी ती दोन शिप्टमध्ये न घेता एकाच शिप्टमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी आधी नियोजित केंद्रामध्ये अधिक केंद्राची आणि इतर मुलभूत गोष्टींची गरज पडणार आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. या संबधित पुढची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
