इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केरळमध्ये NEET 2022 वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या एका विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली आहे की तिला परीक्षेला बसण्यापूर्वी तिची ब्रा काढण्यास भाग पाडण्यात आले. याप्रकरणी किमान १०० मुलींनी तक्रारी केल्या आहेत. सुरक्षा तपासणीदरम्यान ब्राच्या मेटल हुकमुळे मेटल डिटेक्शन मशीनमध्ये बीप असा आवाज झाला. त्यानंतर सुरक्षा कर्मचार्यांनी या विद्यार्थिनींनी त्यांची ब्रा काढण्यास भाग पाडले.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे प्रकरण कोल्लम जिल्ह्यातील नीट केंद्राशी संबंधित आहे. ‘मेटलिक हुक’ असल्याने महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुलीला तिची ब्रा काढण्यास सांगितले. यानंतर पीडित मुलीने तिची ब्रा तिच्या आईला काढून दिली, जेणेकरून तिला परीक्षेला बसता येईल. त्यानंतर तिने स्वतःला पांघरण्यासाठी शालही मागितली.
चदमंगलमचे केंद्र असलेल्या मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने यासंदर्भात कोणतीही जबाबदारी घेण्यास नाकार दिला आहे. कोल्लम पोलिस प्रमुखांनी मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, “सुरक्षा तपासणीनंतर, माझ्या मुलीला सांगण्यात आले की मेटल डिटेक्टरने इनरवेअरचे हुक शोधले आहे, म्हणून तिला ते काढण्यास सांगितले गेले. सुमारे ९०% विद्यार्थिनींना त्यांचे इनरवेअर काढून स्टोअर रूममध्ये ठेवावे लागले. यामुळे परीक्षा लिहिताना विद्यार्थिनींना मोठा मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस उपअधीक्षक कोत्तारक्का यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे १०० मुलींना या अवस्थेला सामोरे जावे लागले. एका विद्यार्थिनीला तिची जीन्स काढण्यास सांगण्यात आले कारण त्यात धातूची बटणे आणि खिसे होते. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्या परीक्षेतून बाहेर आल्या तेव्हा त्यांना सर्व अंडरवियर्स कंपार्टमेंटमध्ये एकत्र फेकलेले आढळले.
NEET 2022 Girl Student Forced to remove inner wear at exam center Kerala Police Complaint