इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा मंडळाला ३ ऑगस्ट रोजी एकाच सत्रात नीट प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. याआधी ही परीक्षा १५ जूनला होणार होती. मंडळानं ३ जून रोजी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट करणं आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी वेळ वाढवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं सुरुवातीला परीक्षा घेण्यासाठी मंडळानं मागितलेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र नंतर ३ ऑगस्ट रोजी नीट परीक्षा घेण्यामागची कारणं योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. नीट परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला आणखी वेळ दिला जाणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.