मुंबई – ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. नीरजने एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. त्यात तो म्हणतो की, माझ्या आयुष्यात खेळ खेळणे किंवा खेळाचे कुठलेही नियोजन नव्हते. त्यामुळेच देशासाठी खेळणे किंवा पदक जिंकणे याचा सुद्धा कधीच विचार केला नव्हता. माझ्या कुटुंबात किंवा माझ्या गावात कुणीही खेळाच्या क्षेत्रात आलेले नाही. अपघाताने मी स्टेडिअममध्ये गेलो. तेथे मी भाला फेकून पाहिला आणि मला आवड लागली. त्यातूनच पुढे हा प्रवास केला आहे. मी अत्यंत कठोर मेहनतीला प्रारंभ केला. मला अनेकांनी सहकार्य केले त्यामुळेच मी आजवर इथपर्यंत पोहचलो आहे, असे नीरजने स्पष्ट केले आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1424255882896965640