वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या कॅबिनेटमध्ये निवडण्यात आलेल्या भारतीय मूळ असलेल्या नीरा टंडन यांना व्हाइट हाउसच्या वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी बायडेन यांच्यातर्फे व्यवस्थाप आणि अर्थसंकल्प कार्यालयाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु विरोध झाल्यामुळे त्यांना मार्चमध्ये आपले नामांकन मागे घेतले होते.
नीरा यांची बुद्धिमत्ता, कठोर मेहनत आणि राजकीय दूरदृष्टी बायडेन प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे, असे सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसचे (सीएपी) संस्थापक जॉन पोडेस्टा सांगतात. २००३ मध्ये गठित झालेल्या सीएपीमधील त्यांचा तज्ज्ञांचा अनुभव आणि नेतृत्वाची कमतरता भासणार आहे, असे ते म्हणाले.
मार्चमध्ये व्हाईट हाउसने अध्यक्ष जो बायडेन यांच्या अर्थसंकल्पीय कार्यालयात नीरा टंडन यांना संचालक बनविण्यासाठी नामांकन प्रस्ताव मागे घेतला होता. दोन्ही पक्षांमध्ये नीरा यांना विरोध होत होता. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांमधून पुरेशी मते मिळविण्यास अयशस्वी ठरल्यानंतर नीरा यांनी नामांकन मागे घेण्याची घोषणा केली होती.
नीरा यांच्या नावाला पाठिंबा देण्याची विनंती बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पार्टीच्या खासदारांनी फेटाळली होती. व्यवस्थापन कार्यालय आणि अर्थसंकल्प कार्यालयाचे संचालकपदाच्या नामांकनातून माघार घेण्याचा निर्णय नीरा यांनी घेतला होता आणि त्यांचा प्रस्ताव आपण स्वीकारला होता, असे बायडेन यांनी सांगितले.
पूर्व भागातील अनेक खासदारांविरोधात त्यांनी केलेल्या ट्विटमुळे त्यांचा नीरा यांच्या नावाला विरोध होता. त्यामुळे त्यांना पाठिंबा मिळणे अवघडच होते असे बोलले जात आहे. जवळपास एक हजारांहून अधिक ट्विट डिलिट करून त्यांनी माफीसुद्धा मागितली होती. परंतु त्यांच्या नावाला विरोध कमी झालाच नाही.