मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परीषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यावर विरोधकांनी आज अविश्वास ठराव आणला. यावरुन विधिमंडळातील वातावरण चांगलेच तापले. गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यासह उपसभापती पदावर अविश्वासाचा प्रस्ताव विरोधकांनी आणला. मात्र, सभापतींवर आक्षेप घ्यायचा असेल तर तो नियमानेच घेता येतो. नियमबाह्य पद्धतीने सभागृहात कामकाज होऊ नये! असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
विधिमंडळात अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो का, नियम काय सांगतो यासह अन्य बाबी ठाकरे गटाचे आमदार अॅड अनिल परब यांनी स्पष्ट केल्या. विधान भवनाबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली.
बघा, काय म्हणाले ते
विरोधकांच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
बघा, सभागृहात ते काय म्हणाले
गोऱ्हे यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे