विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सीमेवरील अवैध कारवायांमध्ये पाकिस्तानचा मोठा भाऊ असलेल्या चीनचे शेपूट वाकडेच राहणार आहे, यात काही वाद नाही. भारताने एकीकडे चर्चेतून प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरीही चीनच्या सीमेवरील खुरापती सुरूच आहेत. आता तर चीनने गेल्या आठवड्यात तिबेटची राजधानी ल्हासा आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील शहर निंगची या दरम्यान बुलेट ट्रेन सुरू केली आहे.
पूर्व लडाखच्या सीमेवरील वाद सोडविण्यासाठी भारत सातत्याने चीनसोबत चर्चा करीत आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने यावर्षी तिबेटमध्ये सीमेलगत 100 पेक्षा अधिक शैन्य शिबीर घेतले. तर पूर्व लडाखच्या सीमेवरील काही भागांमधून सैन्य हटविण्याच्या दिशेवे वाटचाल केली आहे. चीनच्या या सर्व कारवायांमधून चीन हिमालयातील सीमेवर आपले सैन्यबळ वाढविण्याच्या प्रयत्नात आहे, असा अंगाज एका वृत्तसंस्थेने लावला आहे. चीनने गलवान येथील घटनेनंतर सीमेवर तसेही सैन्यबळ वाढविले होते. कोव्हिडमुळे सारे देश एकमेकांसोबत सलोख्याने वागत आहेत. मात्र पाकिस्तान आणि चीनला त्याचे काहीही घेणेदेणे नाही, हे सिद्ध झाले आहे.
पहाडी भागांमध्ये झालेल्या सैनिक शिबिरात चीनच्या 20 यूनिटचे 1000 पेक्षा अधिक सैनिकांनी सहभाग घेतला. प्रतिकुल वातावरणातही युद्ध क्षमता विकसित करण्यासाठी सैनिकांना तिबेट स्वायत्त क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले होते. नियंत्रण रेषेच्या जवळील परिसरात पायाभूत सुविधांमध्येही चीनने मोठ्या सुधारणा केल्या आहेत. हा सारा भारताच्या सीमेला लागून असलेला भाग आहे, हे महत्त्वाचे.
चकमक सुरूच
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात चकमक सुरूच आहे. तर दुसरीकडे हा वाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेची मालिकाही सुरू आहे. सीमेवरील प्रत्येक संवेदनशिल भागात 50 ते 60 हजार सैनिक आहेतस अशी माहिती भारताच्या सैन्य अधिकाऱ्यांना मिळाली आहे.