नवी दिल्ली – एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीच्या माजी पत्रकार निधी राजदान या मोठ्या फिशींग हल्ल्याचा बळी ठरल्याची बाब समोर आली आहे. हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापकपदाची मोठी ऑफर त्यांनी देण्यात आली होती. फसवणूक झाल्याप्रकरणी राजदान यांनीच ट्विट करुन माहिती दिली आहे. यापुढे या विषयावर काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्या २१ वर्षे एनडीटीव्हीत होत्या. हार्वर्डची ऑफर आल्याने त्यांनी जून २०२० मध्ये एनडीटीव्हीचा राजीनामा दिला होता. सप्टेंबर २०२० पासून त्यांचं अध्यापन कार्य सुरू होणार होतं. मात्र, कोरोनामुळे ते जानेवारी २०२१ मध्ये सुरू होईल असे सांगण्यात आलं. अखेर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना समजले आहे.
https://twitter.com/Nidhi/status/1350024214997155840