नाशिक – एनडीएसटी सोसायटीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सर्व समविचारी शिक्षक संघटनांनी एकास एक पॅनल निर्मिती केल्यास निश्चित विजय मिळेल असे समविचारी संघटनेच्या बैठकीत ठरले. भ्रष्टाचारी संचालकांविरोधात सभासदांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यासाठी भक्कम पॅनल दिल्यास विजय निश्चित मिळेल असा सूर एनडीएसटी विकास समितीने बोलावलेल्या बैठकीत उपस्थित सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लावला.
येऊ घातलेल्या सोसायटीच्या निवडणुकीच्या संदर्भात समविचारी संघटनांची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. या आढावा बैठकीत संचालक मंडळाच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात ताशेरे ओढण्यात आले. संचालक मंडळाच्या विरोधात एसीबीच्या कारवाईमुळे हे संचालक मंडळ भ्रष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या संचालक मंडळाने सोसायटीत भ्रष्टाचार सुरूच ठेवला आहे. मिळालेल्या दोन वर्षाचा कालावधी प्रचंड माया गोळा केली. जाता जाता नोकरभरती करून कोट्यावधी रुपये जमा केले. ही सर्व नोकर भरती करताना सभासदांचा विश्वासघात केला. त्यामुळे सोसायटीवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. तेव्हा ही नोकर भरती रद्द केली पाहिजे. यासाठी भविष्यात येणाऱ्या नवीन संचालक मंडळ ही नोकर भरती रद्द करेल असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देतांना जवळपास एक कोटी रुपयाचा फरक कर्मचाऱ्यांना देण्यात आला. मात्र तो त्यांच्या खात्यावर वर्ग करून परत संचालक मंडळाने ९६ लाख रुपये जमा करून घेतले. त्यावर एसीबीने कारवाई केली चेअरमनला अटक झाली त्याची चौकशी सुरू आहे. लवकरच या संचालक मंडळास अटक होण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा भ्रष्टाचारी संचालक मंडळास बाजूला करून प्रामाणिक लोकांचे एक पॅनल तयार करून चांगले सक्षम उमेदवार देऊन निवडणूक लढविण्याचे या बैठकीत ठरले.
बैठकीस जिल्हाभरातून सर्व समविचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात साहेबराव कुटे, आर डी निकम,निलेश ठाकूर, किशोर शिंदे ,संग्राम करंजकर, सुभाष बावा ,अनिल निकम, बी एन देवरे , दत्ता वाघे पाटील ,अरुण आहेर, श्याम पाटील ,किरण माऊली पगार, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दौलतराव मोगल ,अरुण विभुते खैरनार एन एन ,दिलीप आहेर, विजय पाटील, संतोष गांगुर्डे राजेंद्र सोमवंशी, अशोक वाघ ,किशोर शिंदे, आर के तांबे किशोर जाधव, रवींद्र सोनस, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब सोनवणे, त्र्यंबक मार्तंड, सचिन शेवाळे ,सचिन देशमुख ,बापू शेरेकर ,जयेश सावंत, डी एस अहिरे ,संजय पाटील ,आशिष पवार मोहिते इ अनेक पदाधिकारी उपस्थित होते लवकरच पुढील बैठक घेऊन एन डी एस टी विकास समिती ची रचना, उमेदवारी निश्चितीकरण करून उमेदवारांना त्यांच्या मतदार संघात भेटीगाठी घेण्याचे ठरले ,आभार बाळासाहेब सोनवणे यांनी मानले.