सटाणा – नाशिक जिल्हा मध्यवर्थी सहकारी बँकेने शुक्रवारी देवळा व सटाणा तालूक्यातील जप्त केलेल्या २० ट्रक्टरचा लिलाव भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सेवा संस्था ब्राम्हणगाव तालुका सटाणा येथे ठेवण्यात आलेला होता. सदर लिलावात ३ सभासदानी रक्कम भरणा करून ट्रक्टर सोडून घेतले. उर्वरीत १७ ट्रॅक्टरची लिलावप्रक्रिया पार पडली आहे.
बँकेने जप्त केलेल्या ट्रक्टर व इतर वाहन यांची शासन मान्यता प्राप्त मुल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त असून त्या वाहनाचे टप्प्याटप्प्याने जाहीर लिलाव करण्यात येत आहेत. त्यानुसार हे लिलाव करण्यात आले. जिह्यातील सर्व थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा करून बँकेच्या सामोपचार योजनेमध्ये थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा भरणा करून बँकेस सहकार्य करण्याचे व लिलावाची कटुता टाळावी असे बँकेचे प्रशासक कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी आवाहन केले आहे.