नाशिक – गेल्या ३-४ वर्षापासून नैसर्गिक आपत्ती जसे अतिवृष्टी व गारपीट, वादळे व शेतकरी सभासदांमध्ये कर्जमाफी योजनेबाबत असलेल्या सम्रमावस्थेमुळे तसेच कोरोना प्रार्दुभावामुळे वि का. संस्थेच्या व बँकेचे थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून परिणामी संस्थाची व बँकेचे (NPA) एनपीए मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सदर थकबाकीदारांना थकबाकी वसूल देण्यासाठी प्रोत्साहनात्मक बाब म्हणून बँकेने निर्णय घेऊन नवीन सुधारीत आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० राबविनेस नाबार्ड व सहकार आयुक्त कार्यालयाचे मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन मान्यता दिली होती व सदर योजनेची अंतिम मुदत ३० जून २०२१ पर्यत होती. परंतु सदर योजनेची अंतिम दिनांकानंतरही जिल्हाभरातील अनेक संस्थानी व सभासदांनी सदरची सामोपचार परतफेड योजना परत सुरु करणेबाबत मागणी केल्यामुळे बँकेनेही असलेल्या थकबाकीचे कालनिहाय व रक्कम निहाय विगतवारीचा तसेच मोठ्या प्रमाणावरील एन.पी.ए.चा विचार करून सदरची सुधारीत आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजनेस ३० जून २०२२ पावेतो मुदतवाढ देणेबाबतचा सकारत्मक निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला होता. सदरची सामोपचार कर्ज परतफेड योजनेची अंतिम मुदत ३० जून २०२२ रोजी संपत असल्याने ज्या थकबाकीदार सभासदांनी अजूनही बँकेच्या समोपचार कर्ज परतफेड योजनेत सहभाग घेतलेला नाही त्या थकबाकीदार सभासदांनी ३० जून २०२२ पर्यंत योजनेत सहभागी होऊन सामोपचार कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.
बँकेतर्फे सांगण्यात आले की, जेणेकरून सदर सभासद हे सामोपचार कर्ज परतफेड योजनेपासून वंचित राहू नये. याकरिता योजनेस पात्र थकबाकीदारांनी सदर योजनेत भाग घेण्यासाठी आपल्या संबधीत विका सेवा संस्था / शाखेत संपर्क करून सामोपचार कर्ज परतफेड योजनाची माहिती घेऊन कर्जमुक्त होणेबाबत बँकेने आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे दिनांक ३० जून २०१७ अखेर थकबाकीत असलेल्या सभासदांना त्यांच्या कडील थकबाकी भरणेसाठी त्यांच्या थकखात्यावर होणारे व्याजात ४% सवलत देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला असून दिनांक ३०.०६.२०१७ अखेरच्या थकबाकीदारांना सदर ४% व्याज सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेणेबाबत बँकेच्यावतीने आवाहन केले आहे.
सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२०
दिनांक ३० जून २०१६ अखेरीस विविध कार्यकारी संस्था पातळीवर थकीत असलेले सर्व प्रकारचे शेती व शेती पूरक ( अल्पमुदत,मध्यम मुदत, दीर्घमुदत ) संपूर्ण येणे कर्ज व बँकेमार्फत वितरीत केलेल्या थेट कर्ज पुरवठा योजनेंअंतर्गत थकीत झालेले सर्व थकबाकीदार सभासद या योजनेस पात्र राहतील.
कर्जदाराकडील थकीत कर्जाची थकबाकी झाल्यापासून पुढे होणाऱ्या एकूण व्याज रकमेवर खालील तपशिलाप्रमाणे व्याज सवलत म्हणून मिळेल.
अ.क्र. एकूण कर्ज बाकी (मुद्दल) व्याज सवलतीची महत्तम(जास्तीत जास्त) मर्यादा
१ रु.१.०० लाखापावेतो ५०% किंवा रु.७५०००/- यापैकी जे कमी असेल ते
२ रु.१.०० लाख ते रु ३.०० लाखाचे आंत ५०% किंवा रु.१.५०लाख यापैकी जे कमी असेल ते
३ रु.३.०० लाख ते रु.५.०० लाखाचे आंत ५०% किंवा रु.२.५०लाख यापैकी जे कमी असेल ते
४ रु.५.०० लाख ते रु.१०.०० लाखाचे आंत ५०% किंवा रु.३.५०लाख यापैकी जे कमी असेल ते
५ रु.१०.०० लाखांचे वर ५०% किंवा रु.४.५०लाख यापैकी जे कमी असेल ते