नाशिक – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार सभासदानी कर्जाची रक्कम न भरल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ४०३ थकबाकीदार सभासदाची जमीन लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. याअगोदर थकबाकीदारांचे टँक्टर व वाहन लिलाव केले जात असतांना आता बँकेने स्थावर मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्याचे निश्चित केले आहे.
या वसूली मोहिमेत विविध कार्यकारी संस्थाच्या मोठे थकबाकीदार प्रभावशाली थकबाकीदार यांच्यावर सहकार कायदा नियम १०७ अन्वये स्थावर मालमत्ता / जमीन जप्ती करून स्थावर मालमत्ता लिलावाच्या प्रक्रिया करणेबाबत आदेश देण्यात आलेले आहे. त्यानुसार ६९० हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर कर्ज वसुली प्रतिसाद न देत असल्यामुळे त्याची जमीन जप्त करून अपसेट प्राईज मंजुरीसाठी सहाय्यक निबंधक यांच्याकडे प्रकरण मंजुरीसाठी पाठीवण्यात आलेले होते. त्यानी मंजुरी दिल्यांनतर थकबाकीदार सभासदास ७ दिवसाची कर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत नोटीस देण्यात आली होती. मात्र थकबाकीदार सभासदानी थकबाकी कर्जाची रक्कम न भरल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ४०३ थकबाकीदार सभासदाची जमीन लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे बँकेच्या अधिका-यांनी सांगितले. या लिलाव प्रक्रियेत देवळा तालूक्यातील भऊर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे दोन सभासदांचे स्थावर लिलावही झाले. लिलाव रकमेच्या २५ टक्के रक्कम भरणा करण्यात आलेला आहे.
टँक्टरचेही लिलाव
१३ एप्रिल रोजी ३० वाहन, ट्रक्टरचा लिलाव आदिवासी सांस्कृतिक भवन, शिवाजी नगर,दिंडोरी येथे ठेवण्यात आलेला होता. सदर लिलावात तीसही वाहन / ट्रक्टरचा लिलाव संपन्न झाल्याचेही बँकेने सांगितले. बँकेने जप्त केलेल्या ट्रक्टर / इतर वाहन यांची शासन मान्यता प्राप्त मुल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त असून त्या वाहनाचे टप्प्याटप्प्याने जाहीर लिलाव करण्यात येत आहेत. २९ एप्रिल रोजी देवळा व सटाणा तालूक्यातील जप्त केलेल्या २० ट्रक्टरचा लिलाव भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सेवा संस्था ब्राम्हणगाव तालुका सटाणा येथे ठेवण्यात आल्याचेही बँकेच्या अधिका-यांनी सांगितले.
कायदेशीर कारवाई टाळून थकबाकीचा भरणा करा
जिह्यातील सर्व थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा करून बँकेच्या सामोपचार योजनेमध्ये थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा भरणा करून बँकेस सहकार्य करण्याचे व लिलावाची कटुता टाळावी असे बँकेचे प्रशासक कदमव मुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी बँकेतर्फे आवाहन केले आहे.