नाशिक – जिल्हा बँकेने थकबाकीमुळे जप्त केलेले २३८ वाहन, ट्रॅक्टर पैकी सटाणा तालुक्यातील २३ ट्रॅक्टर जाहीर लिलावाचे नियोजन केले होते. पण, एका थकबाकीदारांने थकबाकीचा भरणा केल्याने उर्वरीत २२ ट्रॅक्टरची लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. त्यात २१ ट्रॅक्टरचा लिलाव झाला. या लिलावापोटी बँकेला ५५ लाख ८२ हजार रुपये मिळाले. या लिलावात एका ट्रक्टराचा लिलाव स्थगीत करण्यात आला आहे.
या प्रक्रियेत २००१ ते २०१२ या कालावधीतील थकबाकीदार असलेल्या वाहनांचा यावेळी लिलाव करण्यात आला. बँकेने वारंवार कर्ज मागणी नोटीसा देऊनही व सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नसल्यामुळे सदरची कार्यवाही केली. सदर लिलावा प्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक नितीन ओस्तवाल, वसुली अधिकरी प्रदीप (रमेश ) शेवाळे, विभागीय अधिकारी सूर्यवंशी, सटाणा तालुका पालक अधिकारी व्यवस्थापक राजेंद्र भामरे, हेमंत भामरे, रवींद्र पगार, निलेश भामरे, तुषार अहिरे तसेच विका संस्थेचे सचिव यांनी लिलाव प्रक्रियेस उपस्थित राहून सहकार्य केले आहे.
पुढील लिलाव उद्या दिनांक०९.०२.२०२२ रोजी वडनेर भैरव तालुका चांदवड येथे व दिनांक ११.०२.२०२२ रोजी देवळा येथे होणार आहेत. तरी जिह्यातील सर्व थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा करून बँकेच्या सामोपचार योजनेमध्ये थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करावे असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.