नाशिक – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील थकबाकीमुळे २३८ वाहन व ट्रक्टर जप्त केले होते. त्यापैकी इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील १५ वाहनांपैकी १२ ट्रॅक्टर व एक पिकअप गाडीचा लिलाव करण्यात आला. बँकेस थकबाकी पोटी रक्कम ५१ लाख २४ ह्जार रुपये प्राप्त झालेले आहेत. दोन थकबाकीदारांनी त्याच्याकडील थकबाकीचा भरणा केल्याने त्या वाहनांचा लिलाव करण्यात आला नाही. या ट्रॅक्टर, वाहनाची शासन मान्यता प्राप्त मुल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर बँकेने ही लिलावप्रक्रिया पार पाडली.
ज्या वाहनांचे लिलाव करण्यात आले त्यांचे मालक बँकेचे २००९ ते २०१६ या कालावधीतील थकबाकीदार आहेत. बँकेने कर्ज मागणी नोटीसा देऊनही व वारंवार सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नसलेल्या सदरची कार्यवाही केली होती. सदर लिलाव प्रसंगी बँकेचे प्रशासक अरुण कदम , मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे साहेब, सरव्यवस्थापक नितीन ओस्तवाल हे उपस्थित होते. सदर लिलावास बँकेचे वसुली अधिकरी,बँक कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी तसेच विका संस्थेचे सचिव यांनी लिलाव प्रक्रियेस उपस्थित राहून सहकार्य केले आहे. ( तसेच पुढील लिलाव दिनांक ०८,०९,११ व दिनांक १५.०२.२०२२ रोजी देवळा, चांदवड सटाणा व मालेगाव तालुक्यात होणार आहेत. )
तरी जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे त्याचप्रमाणे सर्व प्रकारची जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली आहे. या योजनेस दिनांक २८/०२/२०२२ पावेतो मुदतवाढ देण्यात आलेली असून सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.