नाशिक – भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा व रयत क्रांती संघटना यांच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वासुदेवजी नाना काळे यांच्या मार्गदर्शनाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंक, ( NDCC ) द्वारका नाशिक समोर सक्तीची कर्जवसुली थांबविणे तसेच शेतकरी सभासद यांना नवीन कर्ज देणे या मागणीसाठी सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकेने वेठीस धरू नये, सक्तीची कर्ज वसुली करू नये, शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव त्वरित थांबवावेत तसेच सरकारी बँकांच्या धर्तीवर ओटीएस स्कीम राबवावी अशी मागणी या आंदोलनाप्रसंगी खा. डॉ. भारती पवार यांनी केली.
या आंदोलनात माजी मंत्री सदाभाऊ खोत, आ.प्रा. देवयानीताई फरांदे,भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, संघटन सरचिटणीस प्रा. सुनील बच्छाव, आ. सीमाताई हिरे, आ. राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुनील केदार, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस बापूसाहेब पाटील, भाजपा किसान मोर्चा नाशिक जिल्हा अध्यक्ष पंकज शेवाळे, ओबीसी जिल्हा प्रमुख संजय शेवाळे, जगन आप्पा आहेर, काका दरेकर, नरेंद्र जाधव, सचिन दराडे , नितीन गायकर, योगेश बर्डे, सुरेश काळे, डॉ. मनोज हिरे, भाऊसाहेब शिंदे, सुनील देवरे, ज्ञानेश्वर काकड, सुभाष पुंडयार, आदेश सानप, योगेश तिडके, भाजपा सोशल मीडिया चे प्रशांत गोसावी, सजन नाठे, शरद कासार, सुनील जाधव, प्रमोद उगले, फिरोज शेख, जयंत आव्हाड, समीर काळे, नामदेव ढिकले, रोहिणी दळवी, हेमंत पिंगळे, रामराव मोरे, मनोज शिरसाठ, चंद्रकांत थोरात, बहिरु दळवी, देवीलाल दरेकर, सचिन खाडेआदी पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.