नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी खेळाडू पॅनेलचे सर्वच्या सर्व दहा उमेदवार विजयी झाले आहेत. आज रविवार (९ एप्रिल) अन्नपूर्णा सभागृह , मते नर्सरी , गंगापूर रोड येथे मतदान व मतमोजणी झाली.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांच्या १० पदांसाठी झालेल्या त्रैवार्षिक (२०२२ ते २०२५ ) निवडणुकीत खेळाडू पॅनेलचे सर्व दहाही उमेदवार, मोठ्या मतधिक्याने विजयी झाले. १० पदांसाठी ११ अर्ज असल्याने कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे
अध्यक्ष श्री धनपाल (विनोद) शाह, सेक्रेटरी श्री समीर रकटे, खजिनदार श्री हेमंत देशपांडे व जॉइंट सेक्रेटरी – १) श्री योगेश (मुन्ना) हिरे व २) श्री चंद्रशेखर दंदणे हे पाच पदाधिकारी तसेच तीन निवड समिती सदस्य : १) श्री सतीश गायकवाड २) श्री तरुण गुप्ता ३) श्री फय्याज गंजीफ्रॉकवाला हे आधीच बिनविरोध निवडून आले होते.
नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्य व त्यांना मिळालेली एकूण मते पुढीलप्रमाणे :
१- श्री महेन्द्र ( राजू ) कारभारी आहेर – ८६६.
२- श्री अनिरुद्ध भांडारकर – ८७०.
३- श्री राघवेंद्र जोशी- ८६० .
४- श्री महेश मालवी – ८६४.
५- श्री बाळासाहेब मंडलिक – ८५७.
६- श्री रौफ पटेल -८४५.
७- श्री जगन्नाथ पिंपळे- ८५१.
८- श्री विनायक रानडे – ८६५ .
९- श्री निखिल टिपरी – ८५६.
१०- श्री शिवाजी उगले – ८४०.
पराभूत उमेदवार श्री महेश भामरे यांना एकूण १२९ मते मिळाली. सदर निवडणुकी साठी ॲड मनीष लोणारी आणि असोसिएट्स यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. उद्या सोमवार दिनांक १० एप्रिल रोजी , सकाळी ११ वाजता कुसुमाग्रज स्मारक , विद्या विकास सर्कल , गंगापूर रोड येथे होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकृत निकाल घोषित होणार आहे. या निर्विवाद यशामुळे अध्यक्ष श्री धनपाल ( विनोद ) शाह यांच्या नेतृत्वाखालील विजयी खेळाडू पॅनेल चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.