मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर गैरकारभार व घोटाळ्यांचे आरोप करीत आहेत. त्यामुळे सरकारच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर्स लावून सोमय्या यांना लक्ष्य केले आहे. किरीट सोमय्या जवाब दो अशा आशयाचे हे पोस्टर्स आहेत. त्यात काही सवाल करण्यात आले आहेत. ते म्हणजे, नारायण राणे वर केलेल्या तक्रारींचे पुढे काय झाले, विजय कुमार गावितवर केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले, कृपाशंकर सिंह वर केलेल्या तक्रारीचे काय झाले, बबनराव पाचपुते वर केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले. या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे आणि पोस्टर्समुळे सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. बघा हे पोस्टर