नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असून त्यांच्या बाबतीत चुकीचा इतिहास ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आल्याने सदरच्या चित्रपटाचा शो पुन्हा दाखविण्यात येऊ नये असा इशारा युवक राष्ट्रवादीच्या वतीने पी.व्ही.आर. सिनेमाचे व्यवस्थापक यांना देण्यात आला.
‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची पूर्णतः मोडतोड करून चेष्टा करण्यात आली असून शूरवीरांच्या कर्तृत्वाबाबत खोडसाळपणा केला आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज रामदासी वेषात दाखवण्याचा मुर्खपणा केला आहे. तसेच बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजलखानाने वार केल्याचे दृश्य चित्रपटात दाखविण्यात आले आहे. छत्रपतींवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजालखानाचा वकील होता. त्याने छत्रपतींवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केल्याचे खोट दृश्य दाखवून चुकीचा इतिहास दाखवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असून त्यांच्या बाबतीत चुकीचा इतिहास ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे हे कदापि सहन करण्यासारखे नाही. त्यामुळे हर हर महादेव चित्रपट पुन्हा दाखविण्यात येऊ नये असा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी चित्रपट गृहाला दिला.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, संजय खैरनार, धनंजय निकाळे, किशोर शिरसाठ, योगेश निसाळ, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, ज्ञानेश्वर पवार, बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, निलेश भंदुरे, अमोल नाईक, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, हर्षल चव्हाण, अक्षय पाटील, प्रविण बोराडे, सागर लामखेडे, योगिता पाटील,अजय पाटील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
NCP Youth Har Har Mahadev Film Oppose