नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. यासोबतच तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आरएलडी, आंध्र प्रदेशमध्ये बीआरएस, मणिपूरमध्ये पीडीए, पीएमके पुद्दुचेरीमध्ये, बंगालमध्ये आरएसपी आणि मिझोराममध्ये एमपीसीला दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही रद्द करण्यात आला.
एनसीपी, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून असलेला दर्जा काढून घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. भाजप, काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (CPI), बहुजन समाज पार्टी (BSP), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि आम आदमी पार्टी (AAP) हे आता राष्ट्रीय पक्ष आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मेघालयमध्ये तृणमूल काँग्रेसला राज्यस्तरीय पक्ष म्हणून ओळखले जाईल, असेही आयोगाने नमूद केले आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1645435836513808386?s=20
NCP Three Political Parties National Status Cancelled