मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक हे थोड्याच वेळात मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. तशी माहिती मलिक यांनीच ट्विट करुन दिली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गैरकारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.
यापूर्वीही मलिक यांनी एनसीबीचे वाभाडे काढले आहेत. खासकरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप मलिक यांनी केले आहेत. याप्रकरणी विविध पातळ्यांवर त्याची चौकशी सुरू आहे. याची दखल घेत वानखेडे यांचे कुटुंबिय न्यायालयात गेले. यापुढे वानखेडे यांच्याविषयी आरोप-प्रत्यारोप करुन त्यांची बदनामी करु नये, असे न्यायालयाने मलिक यांना बजावले होते. त्यानंतर मलिक यांच्या वानखेडे यांच्या संदर्भातील पत्रकार परिषदांना काहीसा पूर्णविराम मिळाला. वानखेडे यांची ३१ डिसेंबरला एनसीबीमधून कार्यसमाप्ती झाली आहे. आता मलिक यांनी एनसीबीच्या गैरकारभाराचा पर्दाफाश करण्याचा निश्चय केला आहे. त्याचसंदर्भात ते आज काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1477313641808465920?s=20