नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांच्यावर भडकले आहेत. निमित्त आहे ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचे. या अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी लिहिण्यात आली आहे. तसेच, नवे नेतृत्व तयार करण्यात पवार हे कमी पडल्याचे म्हटले आहे. यावरुनच भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार साहेबांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हणाले होते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. *संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे. त्यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावे? असा प्रश्न उपस्थित करतानाच भुजबळ म्हणाले की, *तुमचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवार साहेबांचे राजकारण आहे, अशा शब्दात भुजबळांनी राऊतांना सुनावले.
पुढे भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. इतकं बारकाईनं लक्ष त्यानी शिंदे ग्रुप आणि त्यांच्या बॅगवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही भुजबळांनी लगावलाआहे,
NCP Sharad Pawar on MP Sanjay Raut Politics