इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा म्हणणारे महायुतीचे नेते फक्त चालढकल करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा आज गोल्फ मैदानावरुन निघाला. या मोर्चात शरद पवार गटाचे प्रमुख नेते सामील झाले होते. आता बस्स… सरसकट कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ, चला निर्ढावलेल्या महायुती सरकारला जाग आणूया, बळीराजाच्या आक्रोशाला वाचा फोडूया अशा घोषण यावेळी देण्यात आल्या.