नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने संवाद यात्रा सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सध्या ही यात्रा करीत आहेत. मराठवाडा आणि नगरचा दौरा केल्यानंतर पाटील हे नाशिक जिल्ह्यात आज येत आहेत. आगामी तीन दिवस ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. आज दिवसभरात येवला, निफाड, सिन्नर, देवळाली आणि नाशिक शहरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. विधानसभानिहाय ते बैठक घेणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
https://twitter.com/NCPspeaks/status/1443780208268546050