मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयाला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र, त्यांच्यानंतर अध्यक्षपदी कोण विराजमान होणार यावर खल सुरू झाला आहे. मात्र, यासंदर्भात पवार यांनीच एक घोषणा केली आहे.
राज्याच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या शरद पवार यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन आज येथे झाले. लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातच पवार यांनी घोषणा केली की ते आता अध्यक्षपदावरुन निवृत्त होत आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर सभागृहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरोदार घोषणाबाजी केली. हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.
पवार यांच्या घोषणेनंतर चर्चेला उधाण आले आहे ते या पदावर आता कोण विराजमान होणार शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष बनणार की पवार घराण्याव्यतिरीक्त व्यक्ती असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याविषयी शरद पवार यांनीच खुलासा केला आहे. ते म्हणाले की, यासंदर्भातील निर्णय पक्षाची समिती घेईल. समितीला ते अधिकार असतील. यासंदर्भात समितीची बैठक होईल आणि त्यात अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
NCP Politics Sharad Pawar Who is Next President