मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी पक्षामध्ये भूकंप निर्माण झाला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून याबाबत तीव्र विरोध होत आहे. याची दखल घेत पक्षाची राष्ट्रीय समितीयाबाबत निर्णय घेईल, असे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, आज या समितीची बैठक झाली आहे.
या समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परषदेत दिली. पटेल म्हणाले की, ‘लोक माझे सांगती’ या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला. याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. पवार साहेबांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती गठीत केली. या समितीची आज बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला की, आदरणीय खा. शरद पवार साहेबांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे. पक्षाध्यपदी पवार साहेबांनीच राहावे अशी विनंती सर्वानुमते करण्यात येत आहे. हा ठराव पवार साहेबांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडण्यात येईल. त्यावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. देशाला, राज्याला, पक्षाला पवार साहेबांची गरज आहे. पक्षाचे आधारस्तंभ तुम्हीच आहात. त्यामुळे पवार साहेबच पक्षाध्यक्षपदी असावे, अशी सर्वांची भावना असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
‘लोक माझे सांगती’ या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला. याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. पवार साहेबांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती… pic.twitter.com/zRe3N0EsYR
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 5, 2023