मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत जामीन मिळावा म्हणून नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना कुठलाही दिलासा कोर्टाने दिलेला नाही. मात्र, मलिक यांची सध्या जोरदार चर्चा होत आगे. त्याचे कारण म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयकडून होत असलेली कारवाई,
एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, माजी एसपी व्ही. व्ही. सिंह आणि माजी इंटेलिजन्स अधिकारी आशिष रंजन यांच्यावर सीबीआयने आर्यन खान प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा एफआयआर दाखल झाला आहे. यामुळे त्यांनी यापूर्वी तपास केलेल्या अन्य प्रकरणांवर काही परिणाम होणार का, याची चर्चा आता जोर होत आहे.
https://twitter.com/ANI/status/1453250927738200070?s=20
एनसीबीच्याच एका अज्ञात अधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना पत्र लिहून वानखेडेंच्या २६ कारनाम्यांचा भांडाफोड केला होता. यामध्येच अभिनेत्री रिया चक्रवर्तीची एक केस होती. या पत्रातील दाव्यानुसार रिया चक्रवर्ती प्रकरणात आरोपींनी चुकीच्या पद्धतीने अडकविण्यात आले आहे.
https://twitter.com/EconomicTimes/status/1451388601648906240?s=20
विशेष म्हणजे मलिक यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा मलिक आणि वानखेडेंचा वाद हा वैयक्तीक असल्यासारखे पाहिले जात होते. मात्र, सीबीआयने जो एफआयआर दाखल केला त्यानंतर मलिक यांचे अनेक आरोप खरे ठरत असल्याचे दिसत आहेत. यामुळे जेव्हा याचा खटला सुरु होईल तेव्हा वानखेडेंच्या या अन्य प्रकरणांच्या चौकशांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नबाब मलिक आणि वानखडे यांच्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
https://twitter.com/EconomicTimes/status/1451424326641721348?s=20
NCP Nawab Malik NCB Sameer Wankhede CBI Action