पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे कोरोना बाधित झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनीच तशी माहिती दिली आहे. आमच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. आमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी काळजी करण्याचे कारण नाही, असे सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्यात विवाह सोहळ्यांचाही समावेश आहे.
https://twitter.com/supriya_sule/status/1476102886106939395?s=20