पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या पुरूष व महिलेकडे एकत्र असल्यानंतर समाजात आजही चुकीच्या दृष्टीनेच पाहिले जाते, पण आता लग्न झालेली स्त्री आणि पुरूष एकत्र अधिक काळ दिसत असतील तर त्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, अशी चर्चा रंगू लागते. पण हे नाते कोणी कसे आणि का? ठेवत असेल यामागे विचार करण्याचीही गरज आहे. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात नात्याची गुंतागुंतही वाढत चालली आहे. प्रत्येक वेळी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे केवळ शरीरसंबंधासाठी असेलच हा दृष्टीकोन ठेवणे योग्य नाही तर त्याला अनेक पैलूदेखील आहेत.
शरीरासंबंधासाठी नाही तर अनेक गोष्टींसाठी हे नातं निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. केवळ एकाच प्रकारचे हे नाते नसते. एक्स्ट्रा मॅरिटलमधील नाते असणे ही चुकीचेच आहे पण त्यालाही अनेक पैलू आहेत. आता खासदार अमोल कोल्हेंच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. राजकारण, कला अशा विविध विषयांवर आधारित पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच अमोल कोल्हे यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. याअमोल कोल्हे यांना इन्स्टाग्रामवर करोडो फॉलोवर्स आहेत. त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
आता व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत नेटकऱ्यांना सांगितले आहे. त्यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. खरे म्हणजे काही दिवसापूर्वी अशाच एका कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अमोल कोल्हे यांच्या अखेर विषयी अफवा पसरवली होती. खरे तर ती अफवाच होती, कारण ती एक एप्रिलला आली असून एप्रिल फुल बनविण्याचा तो प्रकार होता. परंतु आता खुद्द अमोल कोल्हे यांनीच सर्वांना एप्रिल फुल बनविले आहे.
अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं , अशा कविता म्हणायला फार मज्जा वाटते. त्या कविता चांगल्या वाटतात. पण प्रेम व्यक्त करायला ताकद लागते. तेवढीच ताकद प्रेमाची कबुली देण्यासाठी देखील लागते. त्यात जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर आणखी ताकद लागते.
महत्त्वाचे म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे तीन प्रकार असतात. १ )- लग्नाआधी जुळलेले, २ )- लग्नानंतर जुळलेले आणि ३ ) -लग्नाआधी जुळून लग्नानंतर देखील सुरु असलेले. आता हे सगळे आज सांगण्याची गरज आहे, कारण आज मी माझ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची तुमच्या समोर कबुली देणार आहे. कोण आहे ती? कशी आहे ती? याबद्दल सांगणार आहे. आज ओळख करुन देतोय माझ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची…’
अमोल कोल्हे यांचे अमोल ते अनमोल या नावाचे एक युट्यूब चॅनल असून अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची संपूर्ण माहिती त्यांच्या युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करुन दिली आहे. अमोल कोल्हे यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे एका बुलेटसोबत आहे. व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले की, माझी बुलेट ही मुळची पुण्याची आहे पण सध्या मुंबईत असते. ‘मी अनेक वेळा माझ्या बुलेटसोबत वेळ घालवतो’, असेही अमोल कोल्हे यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. म्हणजे कोणाचे कोणावर प्रेम होईल हे काय सांगता येत नाही!
NCP MP Dr Amol Kolhe Share Video Extramarital Affair