मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी तीन बँकांचे तब्बल ५२ कोटी रुपये बुडविल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारासंदर्भात सातत्याने वक्तव्य आणि आरोप करणारे कंबोज अडचणीत आले आहेत. हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.
कंबोज यांनी दोन खळबळजनक ट्विट केली आहेत. मोहित कंबोज यांनी लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असेही ट्विटमधून कंबोज यांनी म्हटलं होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. पुन्हा मोहित कंबोज तिसरे ट्विट केले. २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं भाकीत त्यांनी आपल्या ट्वीटरद्वारे केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते. मोहीत कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना विधान आले आहे.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहीत कंबोज यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहीत पवार यांनीदेखील मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. मोहीत कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. मोहित कंबोज यांनी अजित पवारांबाबत केलेल्या ट्वीटबद्दल विचारलं असता, रोहित पवार म्हणाले की, “जेव्हा त्यांनी ट्वीट केले, तेव्हाच मी मोहीत कंबोजबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओव्हरसीज बँकेत ५२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा विषय चर्चेत आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन-तीन बँकांना चुना लावला आहे
विशेषतः सामान्य नागरिकांचा पैसा ज्या बँकेत असतो, त्याच बँकेला त्यांनी चुना लावला असेल तर त्यांच्या ट्वीटला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. दरम्यानच्या काळात मोहित कंबोज यांनी अलीकडेच काही खळबळजनक तीन ट्वीट्स केले आहेत. कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.” या ट्वीटमध्ये कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1561553869586411521?s=20&t=JdYrHv33vngKirm1AmLwEg
तसेच बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या मी अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येणार आहे, असा इशाराच कंबोज यांनी रोहित पवार यांना दिला आहे. आधी सिंचन घोटाळा तर आता रोहित पवार यांच्या ॲग्री आणि सहकारी कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असताना दरम्यान, मोहित कंबोज यांच्या ट्वीटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.
NCP MLA Rohit Pawar on BJP MLA Mohit Kamboj 52 Crore Fraud