मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे कोरोना बाधित झाले आहेत. तशी माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. फेसबुक आणि ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती सर्वांना शेअर केली आहे. भुजबळ यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. आता भुजबळ हे सुद्धा कोरोना बधित झाले आहेत. राज्यातील सत्ता समीकरण आणि राजकारणाने वेग घेतला असताना प्रमुख नातेच कोरोनामुळे जायबंदी होत असल्याचे दिसून येत आहे.
https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1541399059251924992?s=20&t=w7dBPEH26WnzRtzUi3SWNQ
https://twitter.com/ChhaganCBhujbal/status/1541399059251924992?s=20&t=w7dBPEH26WnzRtzUi3SWNQ
ncp minister chhagan bhujbal covid positive Maharashtra Political Crisis