मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे सर्व सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता याबाबतचे पंचनामे तत्काळ करून शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.
त्याचप्रमाणे राज्यात ठीकठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी खड्डयामुळे अपघात देखील होत आहेत त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती देखील करावी. याचबरोबर राज्यातील जनतेच्या विकासकामांना स्थगिती देऊ नये अशीही मागणी करण्यात आली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, डॉ जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंढे, दत्तात्रेय भरणे उपास्थित होते.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1548927124748509185?s=20&t=NGFD75mil0PeX3COBDd45w
NCP Leaders Meet CM and DYCM today