मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात (ईडी) हजेरी लावली. ईडीच्यावतीने त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर पटेल हे ईडी कार्यालयात हजर झाले. तशी माहिती स्वतः पटेल यांनी दिली आहे. ईडीने त्यांना दोनदा समन्स बजावले होते. वरळी येथील सीजे हाऊस येथे पटेल यांनी फ्लॅट खरेदी केला आहे. याच प्रकरणात ते सही करण्यासाठी ईडी कार्यालयात आले होते. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्याकडून पटेल यांनी हा फ्लॅट घेतल्याचा आरोप आहे. तसेच, ईडीने यापूर्वी इक्बाल मिर्ची याची काही प्रॉपर्टी जप्त केली आहे. पटेल यांचे मिर्चीसह अन्य काही जणांशी आर्थिक संबंध असल्याचाही आरोप आहे. याप्रकरणात ईडी चौकशी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पटेल यांना समन्स बजावण्यात आले होते. सीजे हाऊस ही अतिशय हायप्रोफाईल सोसायटी आहे.