रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला मात्र पॉपकॉर्न’, छगन भुजबळ कडाडले

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 5, 2022 | 4:07 pm
in स्थानिक बातम्या
0
0b428b7d c1b7 4baa a35e ab80b7400d22 e1667645951145

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फुले, शाहु, आंबेडकरांच्या राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण काही मंडळी करु पाहत आहेत. पण ते विसरतात की धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले – शाहु – आंबेडकरच आम्हाला देतात. धर्मांध पक्षाशी लढा हा विकासाच्या मुद्दावरुनच करावा लागेल. आपण विकासाचे राजकारण करतो पण देशात सध्या काय चालु आहे याचा विचार करत आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार रहावं लागणार आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

“राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा” हे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबीर शिर्डी येथे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे खासदार, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कपाळावर टिकली किवा कुंकू असेल तरच प्रश्न विचार असे वक्तव्य मनोहर भिडे यांनी केलं. केवळ चक्र उलटे फिरविण्यासाठी, मनुवादाला पुन्हा चालना देण्यासाठी हा प्रयत्न होत आहे. ज्या सावित्रीबाई यांच्या कपाळावर भले मोठे कुंकू असतांना महिलांच्या शिक्षणासाठी काम करत असतांना देखील त्यांना दगड, धोंडे, शेन फेकून मारले. त्यामुळे अश्या मनुवृतीच्या लोकांचा आपण निषेध केलाच पाहिजे असे म्हणत त्यांनी मनोहर भिडे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच छत्रपती, फुले, शाहू आंबडेकरांचे समतावादी विचारांचे अनुकरण करतो त्यामुळे कुठल्याही धर्मांध शक्तींना थारा दिला जाणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, देशात वाढती महागाई, बेरोजगारी, गॅसचे दर, पेट्रोलचे दर, अर्थव्यवस्थेची लागलेली वाट, कोळसा संकट, वाढते खाद्यतेल दर या सगळ्या वरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी जाणुन बुजुन तुमच्या समोर वेगळे मुद्दे आणले जात आहे. जेंव्हा केंद्रात आघाडी सरकार होते तेंव्हा महगाईचा दर हा ४.७ % टक्के होता. आज हा दर १४.५५ % टक्के एव्हढा वाढलाय की तुमच्या घरात तुम्हाला रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तुंच्या किमती ह्या २०० ते ३०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. आत्ताच दिवाळी पार पडली मात्र कितीतरी लोकांच्या घरात खायला अन्न देखील नव्हते. शेतकऱ्यांवर पावसामुळे मोठे संकट ओढावले मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची मदत हे सरकार देत नाही. महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असतांना नोटेवर कोणाचा फोटो याचीच चर्चा जास्त असल्याची टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, सत्य परिस्थीतीवर बोलले तर भाजपाच्या यंत्रणा कामाला लागतात आणि मग घरी केंद्र सरकारच्या यंत्रणा येऊन पोहचतात.पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अडचणीत आलेल्या कार्यकर्त्याच्या मागे पक्ष कायम ठामपणे उभा राहतो.ईडीने कारवाई केल्यानंतर जामिन लवकर मिळत नाही. मालमत्तेवरील जप्ती लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया या फक्त भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवरच होत आहेत. या केंद्रीय यंत्रणेमुळे अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांना पवार साहेब कधीही एकटे सोडत नाही, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठीशी कायमच पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिलेला आहे आणि येथुन पुढे देखील राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून आमच्यावर टीका केली गेली. महाविकास आघाडी सरकार असताना विलनीकरणाची मागणी केली गेली, आंदोलन केले गेले, एव्हढच नाही तर पवार साहेबांच्या घरावर हल्ला झाला. आता त्या मागणीचे झाले काय ? आता का एसटीचे विलनीकरण केले जात नाही…? असा सवाल उपस्थित करत केवळ पवार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी यावेळी सांगितले. एका मागून एक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे. नाशिक – पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प रखडविला जात आहे. राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी २०% वाटा उचलण्याला मंजुरी दिली होती. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या भागीदारीतून महारेल या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. वेगवेगळ्या मंजुऱ्यांसाठी ५ वर्षांचा कालावधी गेला. एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का? असा सवाल उपस्थित करत महराष्ट्रातल्या महाराष्ट्रात होणारे हे प्रकल्प होऊ देत नाही आणि अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन च्या मागे लागलेला आहात ज्याचा फायदा महाराष्ट्राला काहीच नाही असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, वेदांता – फॉक्सकॉन सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. तेंव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणु असे म्हणणाऱ्यांनी अजुन एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. या उलट फॉक्सकॉर्न पाठोपाठ आता टाटा एअरबस चा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअर बस चा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आला महाराष्ट्रातले रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात आहेत. मी स्वतः त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिले होते की तुम्हाला सर्व सुविधा देऊ महाराष्ट्रात आणि या नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन या एचएलएल च्या सोबत या एअरबसचे उत्पादन करा, त्यासाठी तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. मात्र तो प्रकल्प गुजरातला गेला. विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’ चा प्रकल्प देखील हैदराबादला गेला. आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ २ हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला अशी सडकावून टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, मोठ मोठे प्रकल्प गुजरातला आणि प्रदूषणाचे प्रकल्प महाराष्ट्राला हा कोणता न्याय ? महाराष्ट्रातून डायमंड मार्केट सुरतला, कपडा मार्केट सुरतला, बेलापुरचे रासायनिक कारखाने दहेजला, आयटी हब अहमदाबादला, टाईल्स व्यवसाय वापीला, मुंबई बंदराची जहाजे वळली कच्छ च्या अदानी पोर्टला, जलद गतीने अजुन व्यवसाय गुजरातला नेण्यासाठी बुलेट ट्रेन ज्यांचा अधिक खर्च महाराष्ट्रावर आहे. नाशिकमधील उद्योग व्यावसायिक हे सातत्याने विकासाची कास धरत आहेत. मुंबई – पुणे – नाशिक हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. त्यात औरंगाबाद जोडून सुवर्ण चतुष्कोन मानला जातो. मात्र, चौकोनातील एक कोन कायम कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय. नाशिकच्या अलायन्स एयर लाईन्स ही विमान कंपनी केंद्राच्या उडान प्रकल्पा अंतर्गत नाशिक मध्ये काम करत होती. ती उडानची स्कीम संपली मात्र कंपनीला चांगला फायदा होत होता नाशिक आणि आजूबाजूच्या शहरांची लोक याचा फायदा घेत होते. मात्र तरी या कंपनीला गुजरात मध्ये जाण्यास भाग पडले असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जी.एस.टी संदर्भातील बातमी आली १.५० लाख कोटी अर्थसंकलन झाले त्यात सर्वात मोठा वाटा हा महाराष्ट्राचा आहे २३ हजार कोटी रुपये महाराष्ट्र देतो आणि गुजरात फक्त ९ हजार कोटी तरी महाराष्ट्राच्या बाबतीत एव्हढा दुजाभाव का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे हे प्रयत्न आहेत मात्र महाराष्ट्र कमजोर होणार नाही. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा या पंक्तीतून विरोधकांना इशारा दिला.

ते म्हणाले की, राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र सध्याच्या सरकारला याकडे पहायला वेळ नाही. शेतकऱ्यांसाठी वेळ नाही फक्त दही हंडी आणि गणपती साजरे करण्यात पुढे असणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना एकरी ५० हजार मदत द्या ही मागणी भाजपाचे नेते करत होते आता सत्ता आली तर ते आश्वासन विसरले. राज्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे दौऱ्यावर जातात. आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात तुम्ही दारू पिता का..? यावर आम्ही मात्र शांत रहाणार नाही येणाऱ्या अधिवेशनात या सरकारला धारेवर धरल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, तिकडे युक्रेनमध्ये जनतेने निवडुन दिलेल्या पंतप्रधान लिज ट्रुस यांनी लोकांना दिलेली आश्वासन पाळु शकलो नाही म्हणुन अवघ्या ४५ दिवसात राजीनामा दिला. आमच्याकडे ८ वर्ष झाली लोक अजुन १५ लाखांची वाट पहात असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, आपण आता कामाला लागले पाहिजे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार राज्यात आणायचे आहे असे त्यांनी सांगितले.

NCP Leader Chhagan Bhujbal State Government
Industrial Development

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयशर टेम्पोने धडक दिल्याने २० वर्षीय पल्सरस्वार ठार

Next Post

नाशिकची सीएट कंपनी आणि कामगारांमध्ये ऐतिहासिक करार; पगारवाढीसह अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
cbi
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये सीबीआयने दोन बेकायदेशीर कॉल सेंटर केले उदध्वस्त…दोन जणांना अटक

सप्टेंबर 14, 2025
Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
Next Post
IMG 20221105 WA0299 1 e1667645838241

नाशिकची सीएट कंपनी आणि कामगारांमध्ये ऐतिहासिक करार; पगारवाढीसह अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011