पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. आता या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. अजित पवार आज मावळच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते. मात्र, अजित पवार हे अनुपस्थित असल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती. त्याच दरम्यान राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरुन राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, अजित पवार यांनी मौन बाळगल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. अजित पवार यांनी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया नोंदवली होती. परंतु, त्याचवेळी अजित पवार यांनी आर्थिकदृष्ट्या मागासघटकांना आरक्षण देण्याचा निर्णय वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. अजित पवार यांनी त्याचे स्वागत केले होते.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाच दिवस कुठे होतो, याबाबत माहिती दिली आहे. अजित पवार यांनी म्हटले की, पाच दिवस आजारी होतो. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्ण विराम लावला. आता जवळपास सात दिवसानंतर अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते @AjitPawarSpeaks यांच्याबाबत जी चुकीची प्रतिमा दाखवण्यात येत आहे त्या गोष्टीला स्वत: अजितदादांनी आपल्या शैलीत पूर्णविराम दिला आहे. pic.twitter.com/j6Z66LBzDX
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 11, 2022
NCP Leader Ajit Pawar Came after Week Says
Politics