मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अस्थिर परिस्थिती आणि राजकीय वातावरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार टिकविण्यासाठी आम्ही सर्व जण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहोत. आम्ही शिवसेनेच्याही पाठिशी आहोत. सध्या निर्माण झालेला पेचप्रसंग नक्की सुटेल, अशी आम्हाला खात्री आहे. बंडखोरी करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. आजवरचा इतिहास तेच सांगतो. गेली अडीच वर्षे उत्तम पद्धतीने सरकार चालले आहे. आमचा एकमेकाशी उत्तम समन्वय आहे. तिन्ही पक्षांचे पालकमंत्री आहेत. निधी मिळण्यात कुठलाही दुजाभाव नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
बघा त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/NCPspeaks/status/1539974473054445569?s=20&t=M1_zQ3GyE78vcvybT4n3Ug
ncp dycm ajit pawar press conference on maharashtra political crisis