मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ७ मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळीच छापे टाकले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ईडीच्या या कारवायांबद्दल ते संतप्त झाले आहेत. अशा कारवाया करुन जर केंद्रातील भाजप सरकारला आम्हाला अडचणीत आणायचे असेल तर ते होणार नाही. सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांचा असा वापर होणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बघा, त्यांची सविस्तर प्रतिक्रीया (व्हिडिओ)
https://twitter.com/NCPspeaks/status/1529747950435328004?s=20&t=hAZMImzO6MsXenfke4h71A