पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर कडाडून टीका करतात. तसेच त्यांचे राजकीय विरोधक देखील त्यांच्यावर तिथे तसाच हल्ला चढवतात, परंतु त्याच वेळी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका न करता त्यांच्या कार्याचे कौतुक करतात, असा अनुभव वारंवार नाही आला तरी बऱ्याच वेळा आलेला दिसतो.
काही वर्षापूर्वी बारामती मध्ये झालेल्या कार्यक्रमात देखील शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पद्धतीचे कौतुक केले होते, तर पुणे येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात देखील त्यांनी मोदींच्या कार्यशैलीचा पुन्हा एकदा कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, त्यांचा स्वभाव असा आहे की, ते एखादे काम हाती घेतात की, ते काम निश्चित पूर्ण होते.
यासोबतच 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या काळात नरेंद्र मोदींविरोधात राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न झाला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पवार म्हणाले की, मी नेहमीच त्यांच्याविरुद्ध सूडाच्या राजकारणाला विरोध केला, परंतु यूपीए आघाडीच्या काही जणांनी गुजरात सरकारच्या काही मंत्र्यांविरोधात कठोर पावले उचलली होती.
पुण्यातील एका कार्यक्रमात पवार म्हणाले की, माझ्यासह तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणत्याही सूड कारवाईला विरोध केला होता. मनमोहन सिंग सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत असताना मोदींशी बोलू शकणारे यूपीए सरकारमध्ये त्यांच्याशिवाय कोणीही नव्हते, असेही पवार म्हणाले. कारण शरद पवार 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारमध्ये कृषिमंत्री होते
पवार आणि म्हणाले की, त्यांचा स्वभावच असा आहे की, त्यांनी कोणतेही काम हाती घेतले की, ते काम संपेपर्यंत थांबणार नाही. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे आणि हा त्यांचा चांगला गुण आहे. पवार म्हणाले, ‘जेव्हा मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मी केंद्रात होतो. पंतप्रधान जेव्हा सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवायचे तेव्हा मोदी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व करायचे आणि केंद्रावर हल्ला करायचे. त्यामुळे अशा परिस्थितीत मोदींना सामोरे जाण्याची रणनीती आखण्यात आली. मात्र यूपीए सरकारमध्ये माझ्याशिवाय एकही मंत्री मोदींशी बोलू शकला नाही.
गुजरातमध्ये जाऊन तेथील समस्या समजून घेणारे ते त्या काळी एकमेव मुख्यमंत्री असल्याचेही शरद पवार म्हणाले. तेव्हा माझे आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मत होते की, मोदींविरोधात सूडाचे राजकारण होऊ नये. तसेच प्रस्थापित कार्यशैलीच्या बाहेर आपण काहीही करू नये, असे आमचे मत होते आणि आम्ही तसे कधीच केले नाही.