मुंबई – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोलकांवर झालेल्या हिंसाचाराची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी प्रथमच भाष्य केले आहे. ते म्हणाले की, केंद्र व उत्तर प्रदेश सरकार हे अतिशय असंवेदनशील आहे. लखीमपूर खीरीची घटना ही जालियानवाला बाग हत्याकांडासारखीच आहे. देशातील शेतकरी हे कधीच विसरणार नाहीत. सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. शेतकऱ्यांनो, तुमच्यावर आणखी हल्ले होऊ शकतात, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे पवार यांनी म्हटले आहे.
पवार पुढे म्हणाले की, शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. अतिशय शांततेने हे आंदोलन सुरू आहे. २६ जानेवारीला त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ज्याची प्रतिक्रीया देशभरात दिसून आली. लोकशाहीत शांततेने बोलण्याचा अधिकार आहे. लखीमपूर खीरी येथेही शेतकरी शांततेत आंदोलन करत होते. एक वाहन शेतकऱ्यांवर थेट चालविण्यात आले. ही घटना आणि हा सारा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1445313529695768576