मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन आज घाटकोपर येथे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या शिबीरास उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. देशात अनेक चिंताजनक गोष्टी घडत आहेत व त्या घडल्यानंतर त्यावर पडदा टाकण्याचे काम होत आहे. वस्तूस्थिती, सत्य परिस्थिती लोकांसमोर येऊ नये, याची काळजी घेतली जाते, असे ते म्हणाले.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, मी ग्रामीण भागात जातो. तिथे दोन मुलांत भांडण झाले, तर पहिला दुसऱ्याला म्हणतो की गप्प बस नाहीतर तुझ्यामागे ईडी लावेन. ईडी आणि सीबीआय हा शब्द घराघरांत माहिती झाली आहे. कारण, सत्तेचा गैरवापर होत आहे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईत आज (२१ एप्रिल) मार्गदर्शन शिबीर पार पडले, या शिबिराला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले, तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांकडून नेत्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईवरून शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. ईडी आणि सीबीआय चौकशी ही घराघरात माहिती झाली, असे शरद पवारांनी सांगितले आहे.
तसेच शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या बाबतही बोलताना एक वेगळा दावा केला. ते म्हणाले की, जळगावातील आपले एक सहकारी आहेत. एकेकाळी ते भाजपाचे नेते होते. त्यांनी भाजपा सोडल्यावर त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली.
खरे तर आज सव्वा दोन वर्षे झाली, त्यांच्या जावयाची केस न्यायालयात नेण्यात येत नाही. त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. त्या तुरुंगात असलेल्यांनी सांगितले की, जर त्यांच्यावरील खोटी केस मागे घेण्यात आली नाही. अथवा निकाल लवकर लागला नाही. तर, खडसेंचे जावई आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा सुरू आहे, असे विधान शरद पवारांनी केले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
NCP Chief Sharad Pawar on Eknath Khadse Daughter in Law