नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे दोन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.
यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत टकले, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पवार हे आता हॉटेल एमराल्ड पार्क येथे दाखल झाले आहेत. तेथे ते विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यानंतर ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशीही विविध विषयावंर चर्चा करणार आहेत.
नाशिक तालुक्यातील देवगाव येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि विद्यार्थिनींच्या वसतीगृह इमारतीचे बांधकाम भूमीपूजन पवार यांचया हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाचे काम होत आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा कार्यक्रम आहे. त्यानंतर पवार हे पुणेकडे प्रयाण करणार आहेत.
NCP Chief Sharad Pawar Nashik 2 Days Tour