मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्यावेळी त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा तपासणीसाठी बोलवले होते. आज ते त्यासाठी गेले असता डॉक्टरांच्या निदर्शनास आले की त्यांच्या तोंडातील अल्सर वाढीस लागला आहे. त्यामुळे तातडीने पवार यांच्या तोंडातील अल्सर काढण्यात आला आहे. तशी माहिती राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. सध्या पवार यांची प्रकृती ठीक असून ते हॉस्पिटलमध्येच आहेत. राज्यासह देशातील कोरोना संकटाबाबतचे अपडेट ते नियमित घेत आहेत. लवकरच ते त्यांचे दैनंदिन काम सुरू करतील, असे मलिक यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या महिन्याभरात पवार हे तिसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1386200501620936705