नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, बाजार समित्या व इतर सहकारी संस्थांवर जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येण्यासाठी नियोजन करा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, नाशिक नाशिक शहर व जिल्हा आढावा बैठक माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या कामकाजाबाबत छगन भुजबळ यांनी आढावा घेतला.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तरच पक्षाची ताकद ही वाढत असते. त्यामुळे संपूर्ण तयारी करून ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार आणि प्रसार करावा. उमेदवारांनी आपली ताकद आणि तयारी अतिशय प्रभावीपणे करावी आणि जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या. येणाऱ्या निवडणूका या विविध पातळ्यांवर लढाव्या लागणार आहे त्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, धर्माच्या वादात किंवा जातीपातीच्या वादात न पडता फुले शाहू आंबेडकरांचे समतेच्या विचारांवर आपण सर्वांनी काम करावे. कारण देशातील सत्ता ही मोजक्या धर्मांध लोकांच्या हातात जाणे हे लोकशाहीसाठी अतिशय घातक असल्याचे त्यांनी सांगितले. विविध संस्थांवर एका विशिष्ट वर्गातील प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहे. या संस्थांवर बहुजन समाजातील प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत. सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षाचे प्रतिनिधी निवडणूक लढत आहे. या सर्वांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नसतील तर नागरिकांच्या हितासाठी प्रसंगी आंदोलन उभे करून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्यात यावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रत्येक विभागात तर ग्रामीण भागात तालुकानिहाय एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करावे अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पक्षाची सभासद नोंदणी मोहीम लवकरात लवकर पूर्ण करावी जे क्रियाशील सभासद असतील तसेच मोहीम यशस्वी राबवतील अशा सभासदांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येणार येईल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, दि.९ डिसेंबर २०२२ पर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यात यावी, शहर व जिल्ह्यात बूथ कमिट्या तयार कराव्यात, शहरात वार्ड प्रमुख, प्रभाग प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्ह्यात गट प्रमुख, गणप्रमुख, गाव प्रमुख नेमणूक करून निवडणुकांची परिपूर्ण तयारी करावी अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधूने, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, अशोक सावंत, माजी आमदार जयवंतराव जाधव, संजय चव्हाण, शिवराम झोले, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, ॲड. शिवाजी सहाने, डॉ.सयाजी गायकवाड, संजय बनकर, पुरुषोत्तम कडलग, सचिन पिंगळे, माजी नगरसेवक गजानन शेलार, सुषमा पगारे, समिना मेमन, जगदीश पवार, हरीश भडांगे, डॉ.शेफाली भुजबळ, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, कविता कर्डक, पूजा आहेर, आशा भंदुरे, किशोरी खैरनार, समाधान जेजुरकर, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, महेश भामरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मनिष रावल, डॉ.विष्णू अत्रे, डॉ. योगेश गोसावी, मधुकर मौले, सलीम शेख, धनंजय निकाळे, सुरेश आव्हाड, डॉ अमोल वाजे, धनंजय रहाणे, शंकर पिंगळे, दिपक वाघ, ऐश्वर्या गायकवाड, योगिता आहेर, शैलेश ढगे, सुरेखा निमसे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गीते, मनोहर कोरडे, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, जीवन रायते, कुणाल बोरसे,संकेत निमसे, प्रशांत वाघ, डॉ.संदीप चव्हाण, समाधान तिवडे, अनिल जोंधळे, चंद्रकांत साडे, आसिफ जानोरीकर, शरीफ शेख, दीपक सोनवणे, उमेश जाधव, रवि हिरवे, नियामत शेख, मनोहर बोराडे, योगेश दिवे, राजेंद्र शेळके, सतीश आमले, ज्ञानेश्वर पवार, गौतम पगारे, मिलिंद पगारे, प्रकाश थामेत, राजेश भोसले, गणेश पेलमहाले, निलेश सानप, साजिद मुलतानी, अकिल खान, झाकीर अत्तार, वसीम शेख, रविंद्र शिंदे, संतोष भुजबळ, संतोष जगताप आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
NCP Chhagan Bhujbal Party Meet Election Candidate
Local Body